विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील कोठारी जवळील जंगलात एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २१ नोव्हेंबर ला उघडकीस आली.
माहितीनुसार, वन विकास महामंडळाच्या झरण वनक्षेत्रात कोठारी- देवई रस्त्यालगत आशा पंकज कोडपे (३०) या महिलेने ओढणीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
सदर महिला पोंभुर्णा तालुक्यातील देवई येथील रहिवासी आहे. ३ नोव्हेंबरला ती आपल्या माहेर चेक बेंबाळ येथून ती सासर देवई येथे जाण्यास निघाली मात्र ती घरी पोहचली नाही. कोठारी येथील काहीजण सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दुर्गधी आली. तेव्हा शोध घेतला असता झाडाला ओढणीने गळफास घेतलेली महिला आढळून आली. कोठारी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता महिलेचे मास गळलेले होते. तिच्या गळ्यात पर्स होता. पर्समध्ये असलेल्या आधार कार्डवरून तिची ओळख पटली. पोलिसांनी मार्ग दाखल करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोंभुर्णा रुग्णालयात पाठविला व मृत महिलेच्या नातेवाइकांना माहीत दिली. मृतक महिलेला मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहेत.