Latest Posts

मारवाडी स्मशान भूमी बोर्डा येथील मंदिरातील शिव शंकराच्या मूर्तीची विटंबना : भादवी चा गुन्हा नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा (Varora) : १३ नोव्हेंबर २०२३ रोजी मारवाडी स्मशान भूमी बोर्डा येथील मंदिरातील शिव शंकराची मूर्तीची विटंबना झाल्याबाबत पोलीस स्टेशनला फिर्यादीने तक्रार दिल्यावरून अप क्र. ९०७/२३ कलम २९५ भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेमुळे परिसरातील विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे व आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरोरा पोलिसांनी तत्परतेने व मानवी बुद्धिमत्तेच्या आधारे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आज १७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्ह्याच्या तपासात आरोपी प्रथमेश रावजी कांबळे (१९) रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड वरोरा यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास ताब्यात घेऊन विटंबना झालेल्या मूर्तीचा भाग हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.

सदर आरोपी हा मनोरुग्ण असल्याचा पूर्व ईतिहास असल्याने आरोपीला वैद्यकिय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राखणे करीता जनतेला पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई आयुष नोपानी भापोसे उपविभाग वरोरा, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे पो.स्टे. वरोरा यांचे मार्गदर्शनात सपोनी पंकज बोंडसे, पोउपनी दिपक ठाकरे, पोहवा किशोर बोढे, दिलीप, दिपक दुधे, नापोशी अमोल धंदरे, पोशी दिनेश मेश्राम, सूरज मेश्राम, फुलचंद लोधी, संदीप मुळे यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss