Latest Posts

मौजा गुंडापुरीतील तिहेरी निघृन हत्याकांडाचा पर्दाफाश : गडचिरोली पोलीसांनी केले नऊ आरोपी जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत ०६ डिसेंबर २०२३ रोजी रात्रो देवु कुमोटी (६०), बिच्चे देवु कुमोटी (५५) वर्षे, अर्चना तलांडी (१०) या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या केल्याची बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

एकाच रात्री अज्ञात ईसमांनी तिघांचीही निघृन हत्या केल्याने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्या हादरला समाजातील सर्वच स्तरातुन सदर घटनेबाबत खेद व्यक्त करुन मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. याकरीता मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य व तिव्रता लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी हा गुन्हा जलद गतीने उघड करण्याकरीता गुन्ह्राचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यावरुन नव्याने अपर पोलीस अधिक्षक अहेरी या पदाचा पदभार स्विकारणारे एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी, बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी त्यांचे तपास पथकासह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे तळ ठोकुन सदरच्या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावुन आऱोपींना जेरबंद करण्याबाबत निर्देशीत केल्याने वरिल सर्व अधिकारी हे त्यांचे सहकारी अधिकारी व अंमलदारांसह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे एकत्रीत येवुन अपर पोलीस अधिक्षक एम. रमेश यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पाच तपास पथक गठीत करण्यात आले. सदर पाचही तपास पथकांना गुन्ह्याशी निगडीत सर्व बाबींचा सखोल तपास होण्याकरीता वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली.

तपासादरम्यान फिर्यादीने रिपोर्ट देतेवेळी कोणावरही संशय अथवा त्याचे वडीलांचा वाद असल्याबाबतचे नमुद केले नाही परंतु फिर्यादी व त्याचा भाऊ शेतातुन परत येत असतांना अनोळखी दोन ईसमांनी त्याचे परिवारास घातपात करणार असल्याची घटनेच्या दोन दिवस पुर्वी धमकी दिली होती असे रिपोर्ट दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी माहीती दिली. सदर बाब अत्यंत महत्वपुर्ण असतांना देखील फिर्यादी किंवा त्याचे कुटु्ंबीयांनी ही बाब लपवुन ठेवल्याने पोलीसांची संशयाची सुई फिर्यादी व मृतकांच्या कुटुंबीयाकडे वळली. मौजा गुंडापुरी येथील पोलीसांच्या गुप्त बातमीदारां मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, मृतक देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असुन तो जादु टोना करुन अनेक लोकांना आजारी पाडत असल्याने त्या लोकांचा पुढे मृत्यु होतो असा संशय मौजा गुंडापुरीतील व त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता परंतु पोलीसांच्या तपासात दिसुन आले की, नजिकच्या काळात या परिसरात जे व्यक्ती मृत्युमुखी पडले ते कँन्सर व अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त असतांना देखील त्यांचे नातेवाईकांनी त्यांना वैदयकिय उपचार न देता वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे नेल्याने त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड होवुन ते मृत्युमुखी पडले परंतु त्या मृतकांच्या नातेवाईकांचा मृतक देवु कुमोटी हा जादु टोना करीत असल्याची धारना असल्याने त्याचे बद्दल प्रचंड प्रमाणात रोष होता त्या संदर्भात गावात यापुर्वी दोन ते तिन वेळा पंचायत बोलावुन त्या पंचायत दरम्यान मृतक देवु कुमोटी यास त्याचेच नातेवाईक असलेल्या परिवाराकडुन समज देण्यात आली होती.

लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन मृतकाचे मुले १) रमेश कुमोटी, २) विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक ३) जोगा कुमोटी, ४) गुना कुमोटी, ५) राजु आत्राम (येमला), ६) नागेश उर्फ गोलु येमला, ७) सुधा येमला, ८) कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, तसेच मृतकाचा जावई ९) तानाजी कंगाली, रा. विसामुंडी, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली यांनी कट रचुन मृतक देवु कुमोटी याचे डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार करुन व मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटी हिचा धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केली. घटनेच्या दिवशी मृतकाची नात अर्चना तलांडी, रा. मरकल ही मृतकांसोबत असल्याने ती आपल्याला ओळखुन पोलीसांना माहीती देईल या भितीने आरोपींनी मागचा पुढचा विचार न करता तिचा देखील धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न होताच वरिल नमुद नऊ आरोपींना पोलीसांना अत्यंत शिताफीने जेरबंद केले.

सदर घटना आरोपींनी अत्यंत योजनाबध्द रित्या व थंड डोक्याने केली असुन घटनेतील आरोपी हे मृतकाचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांचेवर संशय घेवुन पोलीस तपास करीत असल्याने गावकऱ्यांनी देखील पोलीस यंत्रनेवर सुरवातीस नाराजी व्यक्त केली परंतु पोलीसांनी त्यांचा संयम न सोडता आरोपीतांच्या सर्व बारीक सारीक हालचालींवर पाळत ठेवुन वारंवार संशयतांकडे सखोल विचारपुस सुरु ठेवली त्यावरुन त्यांचेमध्ये बरीच मोठी तफावत दिसुन आल्याने पोलीस यंत्रनेकडुन सर्व गुंडापुरी वासीयांची बैठक घेवुन त्यांना संशयीत आरोपी कसे खोटे बोलुन पोलीसांची व गावकऱ्यांची दिशाभुल करीत आहेत हे पटवुन दिले. आरोपी वेळोवेळी वेगवेगळी माहीती देत असल्याने ते खोटे बोलत असल्याची गावकऱ्यांची देखील खात्री पटली अखेरीस सर्व संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन पोलीसांनी गुन्ह्यासंदर्भाने सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्ह्या केल्याचे निष्पन्न झाले.

सदर गंभीर व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्ह्यात पोलीसांनी अत्यंत संयमाने व सातत्याने तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन नऊ आरोपींना जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक, एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि, राहुल आव्हाड, पोमके बुर्गी (येमली ) येथील प्रभारी अधिकारी पोउपनि सचिन आरमळ, पोउपनि सोमनाथ पुरी, पोउपनि सुयश ढोले, मपोउपनि नेहा हांडे, श्रेणी पोउपनि भाष्कर हुर्रे, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोहवा/ अकबरशहा पोयाम, पोअ प्रशांत गरफडे व पोमके बुर्गी येथील पोहवा राजु वडेंमवार, मपोहवा पुष्पा कन्नाके, छाया वेलादी, सिदो किरंगे, मपोअ साधना येमला, रंजना सानप, विदया उदे, सुरेखा वेलादी, पोअ मंगेश तुंबडे, दिपंकर मंडल, महेश आतला, विकास सोयाम, मनोज उईके, धनराज आत्राम, प्रदिप गवई, विनोद गायकवाड, अविनाश कुमरे, विक्की बेपारी, सुनिल टेकाम, खुशाल कुळमेथे, रंगु गावडे यांनी अहोरात्र मेहनत घेवुन गुन्हा उघडकीस आणला.

Latest Posts

Don't Miss