Latest Posts

‘या’ गावात पुरूष करतात दोन लग्न : पहिली करते दुसरीचे स्वागत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / राज्यस्थान (Rajyasthan) : समाजाने आज फार प्रगती केली आहे. लोक आता आधीपेक्षा खूप बदलले आहेत. पण आजही काही समाजाचे लोक हा नवा बदल स्वीकारण्यास तयार नाहीत. ते आजही त्यांच्या जुन्या परंपरा, रितीरिवाज फॉलो करतात. राजस्थानच्या जैलसमेरमधील रामदेयो गावात प्रत्येक पुरुष दोन लग्न करतो. सामान्यपणे महिला पतीच्या दुसऱ्या पत्नीला अजिबात स्वीकारत नाहीत. यावरून अनेक वाद, भांडणे होतात. पण या गावात असे काही होत नाही. उलट या गावात पहिली पत्नीच पतीच्या दुसऱ्या पलीचे स्वागत करते. त्यानंतर दौघीही बहिणीसारख्या आनंदाने सोबत राहतात.

रामदेयो गावात प्रत्येक पुरुष दोन लग्न करतो. यामागे अजब कारण आहे. असे म्हटले जाते कि, जो पुरुष लग्न करतो, त्याची पत्नी कधीच प्रेग्नेंट नाही. जर चुकून त्याची पत्नी प्रेग्नेंट झाली तर मुलीचाच जन्म होतो. अशात येथील लोकांची मान्यता आहे की, दुसरे लग्न केले तर सगळ्यांना मुलगा होतो. जेव्हाही या गावात एखादा पुरुष दुसरे लग्न करतो तेव्हा, त्याची पहिली पत्नी लग्नाची सगळी तयारी करते. पतीच्या दुसऱ्या पत्नीचे स्वागत करते. इतकेच नव्हे तर दोघांच्या मधुचंद्राची ती स्वतः तयारी करते. त्यांनतर आयुष्यभर त्या सवयी म्हूणन नाहीतर बहिणी म्हूणनसोबत राहतात. पण आता काळानुसार गावातील तरुण या रिवाजाला विरोध करू लागले आहेत. अनेकजण म्हणतात कि पुरुषांना आपल्या फायद्यासाठी हा रिवाज सुरु केला ज्याला या महिलांनी आपले नशीब समजले आहे.

Latest Posts

Don't Miss