विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी होत असलेल्या हजरत वली हैदर शाह उर्स व कव्वाली कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन चादर चढवत दर्शन घेतले.
सिरोंचा तालुक्यात दरवर्षी उर्स महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येथे होणाऱ्या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही या उर्स कडे पाहिले जाते. यानिमित्याने होणाऱ्या उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आदी कार्यक्रम व कव्वाली पाहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात.
२८ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी मंत्री धर्मराव बाबा आत्राम,माजी जि.प. अध्यक्ष भाग्याश्री आत्राम आणि युवानेते ऋतुराज हलगेकर यांनी भेट घेऊन चादर चढवत समस्त जनतेला सुख-शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वल्ली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केली.
दरम्यान मस्जिद दरगाह कब्रस्थान ईदगाह ट्रस्ट कमिटी तर्फे पाहुण्यांचे भले मोठे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.