Latest Posts

विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

– महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १.५ लाख रुपयांचे बक्षीस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : माहे फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओनी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या दरम्यान गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास ०३ मे २०२४ रोजी अटक केले आहे.

०३ मे २०२४ रोजी १९ मार्च २०२४ ला उप-पोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मोदुमडगु जंगल परीसरात झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने उप-पोस्टे रेपनपल्ली येथे दाखल अप. क्र. ०१/२०२५ कलम ३०७, ३१३, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादंवि, कलम १३५ मपोका, ३, २५, ५, २७ भाहका, कलम ३, ४, ५ भास्फोका, कलम १३, १६, १८, २०, २३, युएपीए अधिनियम मधील जहाल माओवादी शंकर वंगा कुड्याम (३४), रा. कांडलापारती, पो. तह. भोपालपट्टनम, जि. बिजापुर (छ.ग.) यास सिरोंचा पोस्ट पार्टी व विशेष अभियान पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणाऱ्या रोडवर लावलेल्या नाकाचंदी दरम्यान अटक करण्यात आली.

अधिक तपासात असे दिसून आले की, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. या आधीसुद्धा माओचादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जवरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमधुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके लाचने अशी कामे तो करीत होता.

अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती – १) नाव- शंकर वंगा कुडयाम
– दलममधील कार्यकाळ
सन २०१५ पासून नॅशनल एरिया कमिटीमध्ये भरती होवून आजपर्यंत माओवादी चळवळीतील काम करत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे
– चकमक – ०४
सन २०१२ मध्ये मोरमेड -चितलपल्ली (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
राम २०२३ मध्ये बड़ा काकलेर (छ.ग.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
सन २०२३ मध्ये झालेल्या डम्मुर-बारेगुडा (छ.ग.) जंगल परिसरात माओचादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
सन २०२४ मध्ये झालेल्या लीगमपल्ली- मोदुमडगू (म.रा.) जंगल परिसरात माओवादी व सुरक्षा दलामधील जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग होता. ज्यामध्ये ०४ माओवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाय यश आले होते.

– खून – ०३
सन २०२४ मध्ये मौजा कोरंजेड येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
सन २०२४ मध्ये मौजा कचलेर येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
भोपालपट्टनम (छ.ग.) येथील एका निरपराध व्यक्तिच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता,

– शासनाने जाहिर केलेले बक्षीस
महाराष्ट्र शासनाने शंकर वंगा कुड्याम याच्या अटकेवर १.५ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७९ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलारा यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यानी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss