Latest Posts

आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते कवयित्री/लेखिका सोनाली कोसे यांचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : शिवजयंती उत्सव समिती व सिध्दार्थ ग्रुप तर्फे डोंगरगाव (बुज.) येथे आयोजित १९ फेब्रुवारीला पालखी मिरवणूक व शिवजन्मोत्सव सोहळा आणि २१ फेब्रुवारीला सप्तखंजेरी वादक आकाश टाले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

१९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवानिमित्य गावातून भव्य पालखी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक संजयजी मगर हे उपस्थित होते.

२१ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या प्रबोधनात्मक या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक बंटी भांगडीया (आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र), अध्यक्ष गणेश तर्वेकार (माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद नागभिड), आकाशदादा टाले (युवा प्रबोधनकार), राजू देवतळे (प्रदेश उपाध्यक्ष ओ.बि.सी. महाआघाडी भाजपा), सचिन कठाने व उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रगल्भ मान्यवर आणि सर्व गावकरी वासियांच्या उपस्थितीत सप्तखंजेरी वादक आकाश टाले यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे औचित्य साधून त्याच गावात वास्तव्यास असणारी तरुण कवयित्री / लेखिका कु. सोनाली नामदेव कोसे यांचा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहून आज महाराष्ट्रात आपल्या लेखणीच्या बळाने त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असून ही अभिमानास्पद बाब लक्षात घेता या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक बंटी भांगडीया (आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्काराबद्दल समस्त गावकऱ्यांनी, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी तसेच आमदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून कु. सोनाली नामदेव कोसे यांचे मनोबल वाढवून खूप प्रशंसा केली व पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिले.

Latest Posts

Don't Miss