Latest Posts

मोद्दुमडगू येथील काली मातेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी घेतले दर्शन

– बंगाली बांधवांशी साधला आस्थेने संवाद.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : आलापल्ली लगतचा मोद्दूमडगु येथे दीपावली पासून श्री कालीमाता पूजा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या कालीपूजा महोत्सवाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी काल उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करीत काली मताचे दर्शन घेतले. यावेळी कालीमाता उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बंगाली बांधवांशी राजेंनी आस्थेने संवाद साधत, लवकरच या ठिकाणी भव्य सभामंडप व्हावे. यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, तसेच याप्रसंगी काली माता उत्सव समिती तर्फे राजेंचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच आवर्जून भेट दिल्याबद्दल राजेंचे आभार ही मानण्यात आले.

यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास तोडसाम, अभिजित शेंडे, रंजित हलदार, सदन मालाकर, गुगल मंडल, प्रदीप मंडल, शोभाराणी हलदार, गणेश दास, चिनी बाला, सुवर्णा बाला, महेंद्र बालासह यांच्यासह बंगाली बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss