Latest Posts

गडचिरोली जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षणाची जोड : सहसंचालक राहुल म्हात्रे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : २२ प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान चे सहसंचालक राहुल म्हात्रे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेज च्या नवीन इमारतीला नुकतीच भेट दिली. गडचिरोली जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षणाची जोड निर्माण होतेय असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.तसेच मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये सुरू असलेल्या अभ्यासक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले, गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे व महाविद्यालयाचे समन्वय डॉ. संदीप लांजेवार उपस्थित होते.

मॉडेल डिग्री कॉलेज गोंडवाना विद्यापीठ नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले असून महाविद्यालयाची पाहणी करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे ,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss