Latest Posts

मोदी सरकारचा मोठा निर्णय : पीपीएफसह या स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे नियम बदलले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : केंद्रातील मोदी सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तथा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह काही छोट्या बचत योजनांच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. सरकारने केलेल्या नव्या नियमांनूसार, आता ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत खाते उघडणाच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी हा कालावधी केवळ एक महिन्याचा होता. मात्र, नव्या नियमांनुसारस, हा कालावधी दोन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एखादी व्यक्ती निवृत्तीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडू शकते. यात, मॅच्युरिटीची तारीख अथवा एक्सटेन्शन मॅच्युरिटीच्या तारेवर, योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या दराने व्याज मिळेल. याच बरोबर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजनेत खाते वेळेच्या आधी बंद करण्यासंदर्भातही काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (सुधारणा) – २०२३ असे म्हटले जाऊ शकते. असेही संबंधित अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे.

या योजनांमध्येही बदल –
तर पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज देणे बंधनकारक याशिवाय, राष्ट्रीय बचत FD योजनेंतर्गत असलेले पैसे, मॅच्युरिटी पूर्वी काढण्यांसंदर्भातील नियमांतही काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार, पाच वर्षांच्या कालावधीसाठी खात्यात ठेवलेली रक्कम, खाते उघडल्याच्या तारखेपासून ४ वर्षांनंतर, मात्र मुदतीपूर्वी काढल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज देणे बंधनकारक राहील.

Latest Posts

Don't Miss