Latest Posts

मोदी सरकारच्या योजनांची हमी शासन आपल्या दारी : विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन

– बाजार चौक नगर पंचायत ता. चामोर्शी येथे विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : २५ जानेवारी २०२४ रोज गुरूवार ला बाजार चौकातील नगरपंचायत चामोर्शी येथे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचावे यासाठी विकसित संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले.

या विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर ला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे गौरव दिनाचे औचित्य साधुन शुभारंभ  केला. शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना थेट सामान्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या शहरात आली. याचा लाभ आपण जनतेनी पुरेपूर घ्यावा.

शासन आपल्या स्तरावर काम करीत असतांना नळाद्वारे जल जनतेपर्यंत आतापर्यत १३.५ कोटींहून जास्त नळजोडण्या, चांगले औषध जनतेला चांगल्या तऱ्हेचे उत्तम औषधे मिळावेत व खिशाला जास्त कात्री लागू नये यासाठी औषधांवर किमान ७५ टक्के सुट, आतापर्यंत गरजू व्यक्तींची २३ हजार कोटी रुपयांची झाली बचत, भारत होणार दारिद्र्य मुक्त यातुन ५ वर्षामध्ये १३.५ कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले. कुणीच राहणार नाही उपाशी यातून प्रत्येक महिन्याला ८० कोटीहून जास्त लोकांना मिळत आहे मोफत रेशन.. उज्वला गॅसच्या माध्यमातून महिला धुर मुक्त अशा अनेक योजना शासनाच्या आहेत. यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ थेट लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन केले.

यासोबत खासदार महोदयांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विकसित भारत संकल्प यात्रेचा थेट लाभ असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटन स्थानावरून खासदार अशोक नेते यांनी केले. यावेळी विविध योजनेचे स्टाल लावुन लाभार्थीना प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने उदघाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, नगराध्यक्षा सौ.जयश्री वायलालवार, नगरपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, माजी न्यायाधीश सूनिलजी दीक्षित, नगरसेवक आशिष पिपरे, भाजपा शहराध्यक्ष सोपान नैताम, नगरसेवक निकु नैताम, नगर पंचायत गटनेते राहुल नैताम, सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, प्रेमा आईंचवार, नगर पंचायत सभापति गीता सोरते, महीला पदाधिकारी सौ. स्मिता दीक्षित, ममता श्रीमंतवार, भाजप जेष्ठ नेते माणिकचंद कोहळे, नरेश अल्सावार, नीरज रामानुजवार हनुमंत डंबारे, सतीश भांडेकर वासुदेव चिंचघरे, पोषक गेडाम रमेश अधिकारी, विनोद कीरमे, मुख्याधिकारी फागणेकर व नगरपंचायत चामोर्शी सह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss