Latest Posts

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते चिल्हाटी येथे समाज मंदिर बांधकामाचे भूमिपुजन कुदळ मारून संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील मौजा चिल्हाटी येथे खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आज २७ ऑक्टोंबर २०२३ ला चिल्हाटी येथे कुदळ मारून करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालय चिल्हाटी च्या वतीने खासदार अशोक नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत स्थानिक विकास निधीतून समाज मंदिराला दक्ष लक्ष रुपये मंजुर केले. गावकऱ्यांनी यांचा चांगला लाभ घ्यावा, अस व्यक्तव्य यावेळी केले.

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, शिक्षण महर्षी झामसिंगजी येरणे, जेष्ठ नेते दिपक शर्मा, देवरी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण दहिकर, चिल्हाटी चे सरपंच पुष्तकला मडावी, उपसरपंच रामजी हिरवाणे, छोटू भाटीया, राजू शाहू, श्रीवुषी भाटीया, धनराज बावणथडे, ग्रामसेवक घुबळे तसेच गावातील नागरिक, बंधुभगिनी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss