Latest Posts

मुलचेरा येथे महानाम संकीर्तन व भागवत सप्ताह कार्यक्रम

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील देशबंधुग्राम व भगतनगर येथील मंदिर परिसरात आयोजित महानाम संकीर्तन व भागवत सप्ताह कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून पूजाअर्चा करत आशीर्वाद घेतले.

मुलचेरा तालुक्यात पुनर्वसित बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशबंधुग्राम आणि भगतनगर येथे महानाम संकीर्तन व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. १४ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमास १७ जानेवारी रोजी माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी भेट देऊन पूजाअर्चा करत आशीर्वाद घेतले. दोन्ही गावातील संकीर्तन कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून या कार्यक्रमासाठी देणगी दिले. एवढेच नव्हेतर उपस्थित भविकांसोबत महाप्रसादाचे अस्वादही घेतले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास, राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, विवेकानंदपूरचे सरपंच भावना मिस्त्री, सुंदरनगर चे सरपंच जया मंडल, दोन्ही गावातील ग्रा.प. सदस्य, पोलीस पाटील, कमिटीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss