Latest Posts

मूलचेरा तालुक्यातील विविध दुर्गा देवीच्या मंडळांना भेट देऊन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले दुर्गा मातेचे पूजन

– दुर्गाष्टमीचे मुहूर्तावर हरीनगर, गोमनी, आंबटपल्ली, सुंदरनगर, विवेकानंदपूर, देशबंधुग्राम या गावांना भेटी देत राजेंनी साधला जनतेशी संवाद.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : संपूर्ण देशात नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते आणि नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो. नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात, हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याशिवाय या नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडे परिधान करण्यात येतात. आणि नवरात्रीच्या शुभेच्छा ही देण्यात येतात.

मूलचेरा तालुक्यातील हरिनगर, गोमनी, आंबटपल्ली, सुंदरनगर, विवेकानंदपूर, मूलचेरा, देशबंधुग्राम या गावी मोठ्या उत्साहात दरवर्षी दुर्गा मातेची स्थापना करून नवरात्री उत्सव साजरा केला जातो.

त्यानिमित्याने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी येथील काल दुर्गाष्टमी निमित्ताने विविध गावातील दुर्गा पेंडालला भेट दिली. त्यावेळी दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजे अंब्रिशराव आत्राम यांचे स्वागत केले. राजे यांनी श्री दुर्गा मातेची विधिवत पूजा-अर्चना केली आणि दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व स्थानिक गावकऱ्यांना नवरात्री महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. राजे साहेबानी दुर्गा मंडळातील पदाधिकारी व गावकऱ्या सोबत संवाद साधला व दुर्गा मंडळाला आर्थिक सहकार्य केले. दुर्गा मंडळात सुरू असलेला आर्केष्ट्रा कार्यक्रम पाहत आनंद द्विगुणीत केला.

यावेळी युवा नेते अवधेशबाबा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, भाजप जिल्हा का.का. सदस्य सुभाष गणपती, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, तालुका अध्यक्ष संजीव सरकार, तालुका उपाध्यक्ष विजय बिश्वास, जिल्हा सचिव बादल शाह, महामंत्री अशोक बडाल, उपसरपंच तपन मल्लिक, नगरसेवक दिलीप आत्राम, ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे, संजू पुरकलवार, किशोर मल्लिक तसेच कार्यकर्ते व गावकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss