Latest Posts

मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार

– मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस-२०२४ करीता 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर- भुसावळ- नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे –
१) लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर अनारक्षित विशेष

०१०१७ विशेष  ११ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १४.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता  पोहोचेल.

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी.

०१०१७ साठी संरचना: १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

२) नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
०१२१८ विशेष नागपूर येथून १२ ऑक्टोबर २०२४ रोजी २२.०५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १४.३५ वाजता पोहोचेल.

०१२१८ साठी संरचना : १० शयनयान (५ आरक्षित आणि ५  अनारक्षित) आणि ९ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये १ सामानासह  गार्ड ब्रेक व्हॅन.

०१२१८ साठी थांबे : सिंदी, सेवाग्राम (फक्त ०१२१८ साठी), वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.

३) नागपूर – पुणे अनारक्षित विशेष
०१२१५ विशेष गाडी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.

०१२१५ साठी संरचना : १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

४) पुणे – नागपूर अतिजलद विशेष
०१२१६ विशेष पुणे येथून ११ ऑक्टोबर २०२४ रोजी १६.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल.

०१२१६ साठी संरचना : ८  शयनयान (४ आरक्षित आणि ४  अनारक्षित), ४ द्वितीय सिटींग कार, १ जनरेटर कार आणि १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

०१२१५ आणि ०१२१६ साठी थांबे : अजनी (फक्त ०१२१६ साठी), सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन.

५) भुसावळ – नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष
०१२१३ मेमू विशेष दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी भुसावळ येथून ०४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १२.०० वाजता  पोहोचेल.

०१२१४ मेमू विशेष १२ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपूर येथून २३.४० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी १४.१० वाजता पोहोचेल.

संरचना : १२ कार मेमू

०१२१३ थांबे : मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी.

०१२१४ थांबे : सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड.

आरक्षण : ०१२१६ , ०१०१८ आणि ०१२१८ या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिwww.irctc.co.in या संकेस्थळावर उघडेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी महत्वाची सूचना :
– अजनी रेल्वे स्टेशन : प्लॅटफॉर्म २ आणि ३ पुनर्विकासाच्या कामामुळे तात्पुरते बंद केले जाईल. दीक्षाभूमीला भेट देणारे भाविक अजनी रेल्वे स्थानकावर उतरू शकतात परंतु नागपूर स्थानकावर (प्लॅटफॉर्म ८ बाजू) ट्रेनमध्ये चढण्याची विनंती केली जाते.
– या कालावधीत सेवाग्राम, वर्धा, बल्लारशाह आणि बडनेराकडे जाणाऱ्या गाड्या अजनी स्टेशनवर थांबणार नाहीत.
– विशेष वाहतूक व्यवस्था: नागपूर स्थानकावर, पूर्वेकडील कार ते कोच सेवा आणि पश्चिमेकडील दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग बंद राहतील. त्याचप्रमाणे अजनी स्थानकावरील पार्किंगही बंद ठेवण्यात येणार आहे.
– कार्यक्रमादरम्यान नागपूर आणि अजनी स्थानकावर पिक अँड ड्रॉप सुविधा उपलब्ध नसतील.
– प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या व्यवस्थेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे.

Latest Posts

Don't Miss