विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात आलेला आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करून जिल्हा व तालुकास्तरावर निकाल जाहीर करण्यात आला या अभियानात खाजगी शाळेमधून दिलासा ग्राम कॉन्व्हेंट स्कूल (सीबीएसई) बल्लारपूर या शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. तसेच जिल्हास्तरावर तृतीय स्थान प्राप्त केलेला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानामुळे शाळांमधील सर्व शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्यात आली. हा उपक्रम राबवित असताना विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या स्वच्छतेकडे संपूर्ण लक्ष दिले व त्याची अंमलबजावणी मनपूर्वक करण्यात आली. यासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक सहकर्मी या सर्वांचा संपूर्ण संयोग मिळाला व त्यामुळे शाळेने यश संपादन केले.