– आदिवासी समाजाच्या परंपरेनुसार स्वागत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्राचे वने, सांस्कृतीक, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे गडचिरोली जिल्हयात आगमन झाले असता या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी भव्य स्वागत केले. आदिवासी समाजाच्या मेळाव्यासाठी आ. डॉ. देवराव होळी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून ना. मुनगंटीवार गडचिरोलीमध्ये आले होते.
यावेळी ठिकठिकाणी त्यांचे आदिवासी पध्दतीनुसार व परंपरेनुसार उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी जिप्सीमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच काही ठिकाणी जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीमध्ये आदिवासी, गोंडी बांधवांकडून ढेमसा नृत्य सादर करण्यात आले. या सर्व सत्काराने ना. मुनगंटीवार भारावले. याप्रसंगी त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर आदिवासी देव-देवतांच्या पूजन कार्यक्रम व आदिवासी समाजाच्या मेळाव्यासाठी ना. मुनगंटीवार रवाना झाले.
याप्रसंगी खा. अशोक नेते, आ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत वाघरे, जिल्हाध्यक्ष गोटूल समिती नंदू नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, रविंद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, एम.एम. आत्राम, कुमरे, मारोतराव इचोडकर, दिलीप चलाख, लता पुनघाटे, गोवर्धन चव्हाण, डॉ. नरेंद्रचंद्र काटोले, मुक्तेश्वर काटवे, ॲड. पुराम, अविनाश पाल, कोडापे, प्रभूदास येरमे व शेकडो कार्यकर्त्यांची व नागरिकांची उपस्थिती होती.