Latest Posts

नागपूर- पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची जं. दरम्यान १२ अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : रेल्वे दिवाळी/छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नागपूर- पुणे-  नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची जं.- लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान १२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालवणार आहे.

तपशील –

०१ गाडी क्र. ०१२०१/०१२०२ नागपूर -पुणे -नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- (०८सेवा).

गाडी  क्र. ०१२०२ नागपूर- पुणे द्वि- साप्ताहिक उत्सव विशेष नागपूर येथून २८ ऑक्टोबर २०२४, ३१ ऑक्टोबर २०२४, ०४ ऑक्टोबर २०२४ आणि ०७ नोव्हेंबर २०२४ या  तारखेला १९.४० वाजता सुटेल आणि  पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता ह पोहचेल. (०४सेवा)

गाडी  क्र. ०१२०२ पुणे- नागपूर द्वि- साप्ताहिक उत्सव विशेष पुणे येथून २९ ऑक्टोबर २०२४, ०१ नोव्हेंबर २०२४, ०५ नोव्हेंबर २०२४ आणि ०८ नोव्हेंबर २०२४ या तारखेला १५.३० वाजता सुटेल आणि  नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता ह पोहचेल. (०४सेवा)

थांबे : नागपुर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापुर,  अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि  उरुळी.

संरचना : १८ तृतीय वातानुकूलित, २ गार्ड ब्रेक वॅन एकूण २० कोच असतील.

२. गाडी क्र  ०१११०७/०१११०८ लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची जं.-लोकमान्य टिळक टर्मिनस  साप्ताहिक विशेष ट्रेन (०४ सेवा).

गाडी  क्र. ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची जं. साप्ताहिक उत्सव विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २९ ऑक्टोबर २०२४ आणि ०५ नोव्हेंबर २०२४ या  तारखेला २०.१५ वाजता सुटेल तर नागपूर ला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ पोहचेल आणि पुढे  संत्रागाची जं.येथे तिसऱ्या दिवशी ०५.०० वाजता ह पोहचेल. (०२ सेवा)

गाडी क्र. ०११०८ संत्रागाची जं.- लोकमान्य टिळक टर्मिनस  साप्ताहिक उत्सव विशेष संत्रागाची जं. येथून ३१ ऑक्टोबर २०२४ आणि ०७ नोव्हेंबर २०२४ या  तारखेला १५.५० वाजता सुटेल तर नागपूर ला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५० पोहचेल आणि पुढे  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.४५ वाजता ह पोहचेल. (०२ सेवा)

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राहुल केला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडकपूर .

संरचना : ०१ प्रथम श्रेणी वातानुकूलित ०३ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, १५ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ०१ पेन्ट्री कार २ गार्ड ब्रेक वॅन एकूण २२ कोच असतील .

आरक्षण : विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आधीच सुरू आहे.

वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss