Latest Posts

नारगुंडा येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जनजागरण मेळाव्याचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : १० नोव्हेंबर २०२३ रोजी पोलीस स्टेशन नारगुंडा येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अनुज तारे अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान), कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) व यतिष देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी ) यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन गणापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मेळाव्या दरम्यान भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राठी पो.नी CRPF तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले दलसू नवलू मडावी नवनियुक्त सरपंच विसामुंडी, पुनम पदा सरपंच मिरगुळवंचा, बिरजू पुंगाटीगाव पाटील नारगुंडा, श्रीकांत हेडो, गॅस एजन्सी ताडगाव यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रभारी अधिकारी सतिष गोविंदराव बेले यांनी प्रस्ताविक भाषण केले. त्यामध्ये त्यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान करून भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्यमान कार्ड, आभा कार्डबाबत मार्गदर्शन करून शासकिय योजनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत आव्हान केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलीस अमलदार संतोष आमदरे व आभार प्रदर्शन पोउपनि निखिल वाघोले यानी केले तसेच हॉलीबॉल व कब्बडी स्पर्धेचे नियोजन पो.उप.नि चेतन ढावरे यांनी केले. तसेच जिल्हा पोलीस अंमलदार, SRPF चे अंमलदार सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

आज रोजी आयोजित भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेमध्ये व्हालीबाॅल खेळाचे ०७ संघ व कब्बडी खेळाचे ०६ संघ सहभागी झाले होते.

कबड्डी स्पर्धेमध्ये –
१) प्रथम क्रमांक विसमुंडी कबड्डी टीम A यांना रोख पारितोषिक ३ हजार रु.,
२) द्वितीय क्रमांक नारगुंडा टीम यांना रोख पारितोषिक २ हजार रु.
३) तृतीय विसामुंडी टीम B यांना रोख पारितोषिक १ हजार रु.

हॉलीबॉल स्पर्धाचे –
१) प्रथम क्रमांक ग्राम पोकुर यांना रोख पारितोषिक ३ हजार रू., व हॉलीबॉल + नेट
२) द्वितीय क्रमांक ग्राम विसामुंडी यांना रोख पारितोषिक 2२ हजार व हॉलीबॉल + नेट
३) तृतीय क्रमांक ग्राम कोडपे रोख पारितोषिक १ हजार व हॉलीबॉल + नेट रु. यांनी पटकावला.
४) प्रोत्साहन म्हणून स्पर्धेत सहभागी इतर संघाना हॉलीबॉल व नेट वाटप करण्यात आली.

नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ –
१. आयुष्यमान भारत कार्ड- १४
२. ई-श्रम कार्ड- ०९
३. उज्वला गॅस नाव नोंदणी- १७
४. उज्वला गॅस योजना नाव नोदणी- (ऑनलाईन करणे बाकी ५५)
५. आभा कार्ड – १४४
६. सात बारा – ४२
७. झेरॉक्स प्रती- ८७०

जनजागरण मेळावा तसेच क्रीडा स्पर्धे दरम्यान दिवाळी सनानिमित्य गरजू स्त्रियांना साड्या वाटप- १५०

सदर मेळाव्यास पोलीस स्टेशन नारगुंडा हद्दीतील मौजा- नारगुंडा, कोडपे, पोकुर, खंडी, नैनवाडी, मुत्तेमकुही, विसामुंडी, कत्रणगट्टा, हलवेर, नारगुंडा इ गावातील ३३० ते ३५० नागरिकांची उपस्थिती होती. सर्वांना चहा, नाष्ट्याची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जनजागरण मेळावा व क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच srpf चे अधिकारी व अमलदार यानी मोलाचे सहकार्य केले.तसेच सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका कमला पुंगाटी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Latest Posts

Don't Miss