Latest Posts

नारी शक्ति वंदन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

– खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष गिता हिंगे यांच्या नेतृत्वात नारी शक्ति वंदन मॅरेथॉन स्पर्धेचे आज ४ मार्च २०२४ ला सकाळी ७ वाजता आयोजीत करण्यात आले होते.

यामध्ये नवमतदार मुली, महिला बचत गटाच्या सदस्या, एन जी ओ च्या महिला सदस्य बहु संख्येने सहभागी झाले होते. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले व हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे सुरुवात करण्यात आले.

राष्ट्र निर्माणमधील नारीशक्तीच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी नारीशक्ती वंदन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. महिला मध्ये आत्मविश्वास वाढविणे व देशासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश होता.

या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ३०० ते ४०० स्पर्धकांनी भाग घेतले. यामध्ये प्रथम बक्षीस ७ हजार १ रू., द्वितीय बक्षीस ५ हजार १ रू., तृतीय बक्षीस ३ हजार १ रू. व प्रोत्साहन पर १ हजार रू. असे पाच बक्षीस देण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना विशेष गिफ्ट देण्यात आले.

मॅराथॉनचे आयोजक खासदार अशोक नेते यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ कार्यकर्ते लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, महामंत्री गोविंद सारडा, महामंत्री प्रकाश गेडाम, महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार, प्रदेश सदस्य कामगार मोर्चा गोवर्धन चव्हाण, दलीत आघाडी अरुण उराडे, सुशील हिंगे, केशव निंबोळ, महिला आघाडी जिल्हा महामंत्री त्रिषा डोईजड, कविता उरकुडे, अर्चना निंबोळ, पुष्पा करकाडे वैष्णवी नैताम, निता उंदिरवाडे, सीमा कन्नमवार, पूनम हेमके, कोमल बारसागडे, स्वाती चंदनखेडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss