Latest Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार : खासदार रामदास तडस

– खासदार रामदास तडस यांची वर्धा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी आंदोलन स्थळी भेट,

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती वर्धा जिल्हा यांच्या व्दारे राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी ग्रामिण एएनएम/जीएनएम/एलएलव्ही/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औषध निर्माण अधिकारी /वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांना रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे या करिता १६ ऑक्टोंबरला १ दिवसील राज्यव्यापी आंदोलन केले, तसेच १७ ते २३ या कालावधीत जिल्हास्तरावर १ दिवसीय धरणे, मोर्चे व लेखणीबंद आंदोलन करीत आहे.

वर्धा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती वर्धा जिल्हा यंाचे राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी ग्रामिण एएनएम/जीएनएम/एलएलव्ही/प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औषध निर्माण अधिकारी /वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचाÚयंानी आंदोलन केले, आंदोलन स्थळी खासदार रामदास तडस यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जानुन घेतल्या तसेच त्यांचा विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे विषय मांडणार, तसेच हिवाळी अधिवेशन काळात लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार रामदास तडस यांनी सर्व कर्मचा-यांना दिले. यावेळी दिलीप उटाणे, संगीता रेवडे, विना वासणिक, डॉ. अवनाश गणवीर, राजेश महादुरे, हनुमान कांबळे, निखील गायकवाड, सुशिला शिंदे, मनोज वरभे, डॉ. भारती पारधी व विविध विभागात काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.

कोविड-१९ काळात मध्ये माणुस माणुस ओळखत नव्हता, सगळे दुरावले होते या काळात  कोरोना महामारीत आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देवदूतासारखे कोवित महामारीवर मात करण्याकरिता रात्रदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे. या सर्व कर्मचा-यांची ओडीसा, पंजाब, राजस्थान व मनीपूर सरकार व्दारा ज्या प्रमाणात रिक्त पदावर समायोजन केले त्या प्रमाण महाराष्ट्र सरकारने सर्व कर्मचा’यांचे समायोजन करावे अशी मागणी आहे, हा विषय राज्यसरकारच्या अधीन असल्यामुळे मागणी मान्य करण्याकरीता  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विषय लावुन धरणार व लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss