Latest Posts

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagapur): मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येत आहे. २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन व्यापक स्वरुपात साजरा करण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये मैदानी प्रकारामध्ये ५० मी., १०० मी., ३०० मी. व ६०० मी. धावण्याची शर्यत, १ किमी चालणे, व्हॉलीबॉल, हॉकी (पेनॉल्टी शुटआऊट), मिनी फुटबॉल (३ वि ३), टेनिस बॉल क्रिकेट, टग ऑफ वार- बास्केटबॉल (३ वि ३), खो-खो, रिले मॅराथॉन तसेच इनडोअर प्रकारामध्ये बॅडमिंटन, बुध्दिबळ, टेबल टेनिस- योगासन, कॅरम तसेच फन अ‍ॅक्टीव्हीटीमध्ये लिंबु शर्यत, दोरी उडी मारणे, लंगडी, लगोरी या खेळाचे विविध वयोगटमाध्ये आयोजन करण्यात येणार आहे. २९ ऑगस्ट ला दुपारी ४ वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन सर्वसाधारण विजेतेपद मिळविलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार शाळा व खेळाडू यांना प्रोत्साहन बक्षिस देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज २६ ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत किंवा  dsongp३०@gmail.com या ईमेलवर पाठवावे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघ, खेळाडू तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss