Latest Posts

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्रवेशद्वारांवरून ऑनलाईन प्रणालीव्दारे आरक्षण सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील उमरझरी, बकी व पितांबरटोला हे प्रवेशव्दार वगळता इतर सर्व प्रवेशव्दारावरून पिटेझरी, मंगेझरी, चोरखमारा-१. चोरखमारा २. चंद्रपूर व खोली पुर्णतः ऑनलाईन पध्दतीने पर्यटन सुरू करण्यात येत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सफारी व इतर उपक्रम या महाराष्ट्र वन विभागाच्या आरक्षण प्रणालीव्दारे सुरू करण्याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडुन सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ ते १५ जून २०२५ पर्यत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सफारी करीता महाराष्ट्र वन विभागाच्या http://safaribooking.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीव्दारे सफारीचे आरक्षण सुरू करण्यात आलेले आहे.

तरी यापुढे नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्पातातील सफारी बुकिंग करतांना फक्त http://safaribooking.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीव्दारे सफारीचे आरक्षण करण्यात यावे. याव्यक्तीरीक्त दुसऱ्या संकेतस्थळावरुन आरक्षण केल्यास भविष्यात उद्भवणा-या पेचप्रसंगास हे कार्यालय जबाबदार राहाणार नाही.

Latest Posts

Don't Miss