विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली शहरात दरवर्षी दुर्गा मातेची स्थापना करून नवरात्री महोत्सव मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोद पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी शहरातील मंजुळा माता शारदा महिला मंडळ तुकोजी चौक रामनगर, शारदा महिला मंडळ मथुरा नगर, कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, महिला दुर्गा मंडळ स्नेहनगर, जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर, नवदुर्गा उत्सव मंडळ इंदिरानगर येथील दुर्गा मातेची विधिवत पुजा-अर्चना, आरती करून मंडळाला भेट दिली. यावेळी माता चरणी नतमस्तक होऊन समस्त जनतेला सुख-समृद्धी व आरोग्य संपन्न लाभो अशी प्रार्थना केली.
यावेळी रामनगर येथील मंजुळा माता शारदा मंडळचे अध्यक्ष मंदा मांडवगडे, रंजना भुरसे, अंजना वाढई, मंदा काळे, सुनीता मडावी, वेणू मुल्लेवार, अल्का देशमुख, छाया श्रीपदवार, सोनी मडावी, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे मथुरा नगर शारदा महिला मंडळचे अध्यक्ष शितल बुरांडे, भाग्यश्री भजपुजे, स्मिता मडवी, कविता कस्तुरे, शोभा ठाकरे, सुनिता उसेंडी, कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, प्रवीण कुंभारे, सुचिता धकाते, प्रकाश धकाते, रूपाली शेरके, महिला दुर्गा मंडळ स्नेहनगरचे अध्यक्ष सौ. बोलुवार जगदाळे, खांडरे, बंडावार, बोबडे, कांबळे, राऊत, कात्रटवार, पेद्दीवार, नंदनवार जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगरचे अध्यक्ष राकेश बनकर, सचिव विजय गडपायले,अमित चापले, खुशाल पेंदोरकर, हिराजी खेवले, अमोल वैरागडे, चेतल बालमवार नवदुर्गा उत्सव मंडळ इंदिरानगर येथील लालाजी वैरागडे, दीपक जवादे, कुकडकर ठेकेदार, राजेंद्र बोबाटे व भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.