Latest Posts

NEET UG सह या प्रवेश परीक्षांसाठी जानेवारीमध्ये नोंदणी सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : विद्यार्थ्यांसाठी (Student) जानेवारी (January) महिना महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनेक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणार आहे.

जेईई मेन सेशन-१ ची परीक्षा २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जेईई मेनसाठी नोंदणी आधीच झाली आहे. तर CUET PG २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया २६ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात ज्या परीक्षांसाठी नोंदणी सुरू होणार आहे त्यांची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET) –
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा (MHT CET) द्वारे केले जातात. MHT CET २०२४ परीक्षेसाठी नोंदणी जानेवारी महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. MHT CET २०२४ परीक्षा १६ एप्रिल ते ५ मे २०२४ या कालावधीत घेण्यात येईल. अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्याा.

NEET UG २०२४ –
NEET UG ही पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. याद्वारे एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. NEET UG NTA द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते. NEET UG २०२४ ची परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही NEET UG २०२४ neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

CUET UG २०२४ – 
केंद्रीय विद्यापीठ आणि अनेक राज्य विद्यापीठांमधील प्रवेश हे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (CUET २०२४) च्या स्कोअरवर आधारित आहेत. CUET UG २०२४ परीक्षा १५ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत घेण्यात येईल. त्यासाठीची नोंदणी प्रक्रियाही जानेवारी महिन्यातच सुरू होणार आहे.

Latest Posts

Don't Miss