Latest Posts

नेताजी स्पोर्टिंग क्लब कांचनपूर तर्फे आयोजित रबरी बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन संपन्न

– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत कांचनपूर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे जिल्हा परिषद गडचिरोली हे होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून खेवले मुख्याध्यापक राजे धर्मराव हायस्कूल लगाम, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बासू मुजुमदार उपसभापती पंचायत समिती मूलचेरा, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, वैष्णव ठाकूर, शुभास सरकार, दयाल मंडल, निताई सरकार, सरजित मंडल, सुशांत समदार, सपन मजुमदार, संजय रॉय, प्रश्नजीत रॉय, असीम मजुमदार, रत्नेस्वर बाईन, पिंकू मंडल, चंदन मिस्त्री हे होते.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेला हजरी लावली होती.

या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार २० हजार १ रु. पुरस्कार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार १५ हजार १ रु. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या तर्फे देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार १० हजार १ रु. माजी समाजकल्याण सभापती माधुरी संतोष उरेते यांच्या कडून देण्यात आला.

यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी कांचनपूर येथील गावकरी, युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss