Latest Posts

कुरुड गावातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश

– गडचिरोली पोलीसांनी केले आरोपीस जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कुरुड गावातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश झाला आहे. सदर हत्या हि ८ फेब्रुवारी २०२४ चे ३.०० वाजता ते ९ फेब्रुवारी २०२४ चे ८.०० वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृतक प्रदिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार (३०) रा. कुरुड तह. देसाईगंज, जि. गडचिरोली यांचे डोक्यावर मारुन त्यास गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

त्यानुषंगाने पोस्टे देसाईगंज येथे मर्ग क्रमांक ०४/२०२४ कलम १७४ जाफौ. अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. सदर अकस्मात मृत्युमध्ये अधिक तपास करुन मय्यत प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार यांच्या डोक्यावर मारुन त्यास जिवानिशी ठार मारणाऱ्या अज्ञात आरोपीविरुध्द पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे २८ फेब्रुवारी २०२४ रोजी अप क्र. ०६५/२०२४ कलम ३०२ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांर्भीय लक्षात घेता, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीय आणून आरोपीस अटक करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांनी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले. त्याप्रमाणे तपास पथकाने कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलीस उपनिरीक्षक धनगर, पोअं/ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम विकास जनार्दन बोरकर (५०), धंदा-मजुरी रा. कुरुड तह. देसाईगंज, जि. गडचिरोली याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्रामध्ये ०६ मार्च २०२४ रोज सायंकाळी ०५:09 वा. अटक करण्यात आली.

अधिक तपासात असे दिसून आले की, मय्यत हा आरोपीची पत्नी व मुलगी यांचेकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा व त्यांचे घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रो १०:०० ते १०:३० वा. चे दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट- वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली.

सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसतांना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट देसाईगंज यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस ०७ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर, पोना/२९७३ राऊत, पोअं/५५३८ ढोके, पोअं/३८६४ कुमोटी, पोअं/४०३२ सराटे व पोअं/३७५५ शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे.

Latest Posts

Don't Miss