Latest Posts

दोन नाही…तर तीन जणांचा गेला बळी

– वाघाच्या हल्ल्यात आणखी एका व्यक्ती चा मृत्यू प्रकरण उघडकीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील मार्कंडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या लोहारा येथे वाघाच्या हल्ल्यात आणखी एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार २० जानेवारी रोजी उघडकीस आली. बापू नानाजी आत्राम (४५) रा. लोहारा ता. मुलचेरा असे मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव असून रेंगेवाही उपक्षेत्रातील जंगलात बापू आत्राम यांचा शिर धडावेगळे झाल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

मृत्यूक इसम बापू आत्राम हे काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. गावकऱ्यांनी शोध घेतला असता रेंगेवाही गावालगतच्या जंगल परिसरात शरीरातुन डोकं गायब असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मात्र नरभक्षक वाघाला १८ जानेवारीला जेरबंद करण्यात आला होता, तर ही घटना घडली कशी? असा प्रश्न नागरिकांना पडला वाघाची दहशत थांबेना अशी भिती निर्माण झाली होती. परंतु मृत्तदेह हे कुंजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना वाघाला जेरबंद करण्याआधी ची असावी असा अंदाज लावला गेला आहे.

Latest Posts

Don't Miss