Latest Posts

आता पुन्हा एकदा वादळ, ताशी ४० KM वेगाने वारे वाहणार : हवामान बिभागाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : दोन दिवसांपूर्वी मुंबईत धुळीचे मोठे वादळ आले होते. वादळ काही वेळातच थांबले तरी या वादळाची चर्चा मात्र, अद्याप थांबलेली नाही. या वादळाचे फोटो आमइ व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
अशातच आता पुन्हा एकदा वादळ येणार आहे. ताशी ४० KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने या वादळाचा इशारा दिला आहे.

३०- ४० किमी प्रतितास प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. पुढील तीन ते चार तासांत नुंदरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात हे वादळी वारे वाहणार आहेत. या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. घराबाहेर जाताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईला वादळाचा मोठा तडाखा –
१३ मे रोजी मुंबईत वादळ आले होते. या वादळामुळे मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ६७ लोक जखमी झाले आहेत. वादळासह पाऊस आल्याने १०० पेक्षा अधिक लोक या होर्डिंगकाळी थांबले होते. यावेळी हे होर्डिंग कोसळले.तर, दुसरीकडे वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळले. यामध्ये १२ ते १३ कारचे नुकसान झाले.

मान्सून रविवारी अंदमानमध्ये हजेरी लावणार –
पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून यंदा २ दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होत आहे. यंदा प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी झालाय. दरवर्षी २१ मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानमध्ये दमदार हजेरी लावतो. त्यानंतर केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी राज्यात पावसाने दडी मारली होती. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. यंदा मात्र २ दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होत आहे.

Latest Posts

Don't Miss