Latest Posts

आता शाळेत शिकवणार AI शिक्षक : या राज्यातील शाळेत सुरू झाला अनोखा प्रयोग

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : गेल्या काही काळापासून भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) ची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रात रोज नवनवीन बदल होताना दिसत आहेत.

आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भारतातही शिक्षण क्षेत्रातही होतोय. केरळ हे पहिले राज्य बनले आहे, जिथे AI च्या मदतीने शिक्षण घेतले जात आहे.

यासाठी एका ह्युमनॉइड रोबोटचा वापर करण्यात येत आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम येथील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात या AI शिक्षकाचा गेल्या महिन्यातच समावेश करण्यात आला. हा AI शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. साडी घालून शिकवणाऱ्या या महिला रोबोट शिक्षकाचे नाव आयरिस आहे. या रोबोटमध्ये अनेक फीचर्स आहेत. AI रोबोट आणणाऱ्या कंपनी MakerLabs Edutech च्या मते Iris ही केरळमधील, नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह AI शिक्षक आहे.

Latest Posts

Don't Miss