Latest Posts

आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावे लागणार? सरकारकडून नवीन अपडेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : एकीकडे आधार (Aadhaar Card) मोफत अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावे लागणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.केंद्र सरकारने (Central Govenment) आधार कार्ड (Aadhaar Card) आणि मतदार ओळखपत्र (Voter ID) लिंक करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

व्होटर आयडीसोबत आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतंही टार्गेट किंवा मुदत अद्याप ठेवण्यात आलेली नाही.

आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावे लागणार?
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, भारत सरकारने मतदान ओळखपत्रासोबत (Aadhaar Link Voter ID) आधार कार्ड लिंक करण्याला आतापर्यंत सुरुवात केलेली नाही. सध्या आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया चालू आहे. मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचे कोणतेही लक्ष्य अद्याप देण्यात आलेले नाही.

केंद्र सरकारकडून नवीन अपडेट –
कायदा मंत्री मेघवाल यांनी सांगितले की, भारताच्या निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, EPIC शी आधार लिंक करणे अद्याप सुरू झालेले नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करू शकता. पण, आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करणे अद्याप बंधनकारक करण्यात आलेले नाही.

तुम्ही फॉर्म 6B कधी सबमिट करू शकता?
तुम्हाला मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करायचा असल्यास, तुम्हाला फॉर्म 6B सबमिट करावा लागेल, ज्याची अंतिम मुदत मार्च २०२४ अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काँग्रेस खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा मंत्र्यांनी सांगितले की, ज्यांची ओळखपत्रे वेगळी होती आणि नावे सारखी होती, त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत –
दरम्यान, आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. या तारखेनंतर UIDAI आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट किंवा बदल करण्यासाठी शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसल्यास वेळ न दवडता वेळीच हे काम करुन घ्या आणि नंतर दंड भरण्यापासून सुटका मिळवा.

Latest Posts

Don't Miss