Latest Posts

ओबीसींना लोकसभेमध्ये ५२ टक्के हिस्सेदारी द्या : सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहिरनामामध्ये जातनिहाय जनगणना, केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय समाविष्ट असणाऱ्या पक्षानाच निडणुकीत मदत करा तसेच राजकीय पक्षाने ओबीसींना लोकसभेमध्ये ५२ टक्के हिस्सेदारी देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महासचिव सचिन राजूरकर यांनी पंजाब मधील अमृतसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पाहिले अधिवेश नागपूर, दुसरे न्यू दिल्ली, तिसरे मुबंई, चौथे हैदराबाद, कोरोना मुळे पाचवे व सहावे अधिवेशन ऑनलाइन वेबिनार द्वारे करण्यात आले सातवे अधिवेशन तालकटोरा न्यू दिल्ली आणि आठवे तिरूपती येथे संपन्न झाले आहे.

नववे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर होत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, ऑल इंडिया बॅकवर्ड फेडरेशन चे उपाध्यक्ष जसपाल सिंग खिवा, माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंह चे नातू इंद्रजित सिंग, ओबीसी नेता सतपाल सिंग सोखी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे युवा अध्यक्ष सुभाष घाटे, हरप्रित सिंग, जोगेंदर सिंग उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss