Latest Posts

निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा- २०२३ भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची सुविधा आयोगाकडून उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा- २०२३ या परीक्षेची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात आला आहे.

या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये Post Preference / Opting Out वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support- online@mpsc.gov.in या ई- मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क करावा, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss