Latest Posts

शासकीय कामात अडथळा निर्माण करुन, किरकोळ जखमी करणा­ऱ्या दोन महिला आरोपीस २ महिने कारावास 

– प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा
– गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व आशुतोष नि. करमरकर यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज (Desaiganj) : पोलीस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी मपोउपनि. सोनम नाईक हे आपले हद्दीतील मपोउपनि. सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलींग करीत असतांना गांधीवार्ड देसाईगंज येथील आरोपी क्र. १) रजनी रामचंद्र आत्राम (४७) रा. गांधीवार्ड देसाईगंज ही तीचे राहते घरी अवैधरीत्या देशी विदेशी दारुची विक्री करते अशी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन, पंचांसमक्ष आरोपी नामे रजनी आत्राम यांचे घराची झ्डती घेत असतांना आरोपी क्र. २) शितल रामचंद्र आत्राम (२६) रा. गांधीवार्ड, देसाईगंज हिने माझ्या आईला दोन मुली पोसायचे आहेत म्हणुन माझी आई दारु विकते, हे माझे घर आहे तुमचे पोलीस स्टेशन नाही असे म्हणून एकाएकी फिर्यादीचे अंगावार येऊन दोन्ही हात पकडुन शोकेस आलमारीकडे ढकलत नेले व मान खाली दाबुन मानेवर बुक्यांनी मारले. त्यावेळी सोबत असलेली मपोउपनि. सुजाता भोपळे यांचे दोन्ही हात पकडुन खाली ढकलुन दिले. तेव्हा पोलीस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आरोपी क्र. १ व आरोपी क्र. २ यांनी आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली.

असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी अप क्र. ५७९/२०२१ अन्वये कलम ३५३, ३३२, ५०४, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीस २८ ऑक्टोबर २०२१ रोजी १४.०२ वा अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ३८/२०२२ नुसार खटला सत्र न्यायालयात चालवून, फिर्यादी पंच व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्र धरुन ०१ एप्रिल २०२४ रोजी आरोपी क्र. १) रजनी आत्राम (४७) रा. गांधीवार्ड देसाईगंज व आरोपी क्र. २) शितल रामचंद्र आत्राम (२६) रा. गांधीवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली या दोघींना जिल्हा व सत्र न्यायाधीश, आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम ३५३, ३४ भादवी मध्ये दोषी ठरवून २ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १०दिवस वाढीव शिक्षेची तरतुद करण्यात आली.

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्राचा प्रथम तपास सपोनि. राजेश गावडे पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबंधीत साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss