Latest Posts

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती ग्राम परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे

– भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे संपन्न झाली. किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये ग्राम परिक्रमा यात्रेची माहिती व किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली.

त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भूरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश बारासागडे उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना ग्राम परिक्रमा यात्रा ची संपूर्ण माहिती सांगितले. त्याप्रसंगी ते बोलले की, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने संपूर्ण देशभर ग्राम परिक्रमा यात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या यात्रेच्या माध्यमातून दोन लाख गावापर्यंत पोहोचण्याचा लक्ष आहे.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी १२ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथून या यात्रेची सुरुवात केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ग्राम परिक्रमा यात्रे दरम्यान पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे संकल्प पत्र (जाहीरनामा) तयार करण्यासाठी शेतकरी व मजुरांची मदत घ्यायचे आहे व तयार केलेला जाहीरनामा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे.

ग्राम परिक्रमा यात्रे च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व भारतीय जनता पक्षाचा संकल्प पत्र तयार करणे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी सिंचाई योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, परंपरागत कृषी विकास योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, नमो किसान सन्मान योजना, सौर कृषी पंप योजना अशा विविध प्रकारच्या लाभदायक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.

भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर –
जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजभे माजी राज्यमंत्री अंब्रिशराव महाराज आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर केले.

जिल्हा महामंत्री म्हणून शेषराव कोहळे, संजय निखारे, रामचंद्र ढोंगे, मनमोहन बंडावार यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नंदकिशोर ढोरे, कमलराव सडमेक, प्रदीप मालाकार, गोपाल उईके, रमेश समुद्रलवार, सुकमाल हलदार व वासुदेव गावतुरे यांची नियुक्ती करण्यात आली. सतीश भांडेकर, खेडचंद वैरागडे, मधुकर नखाते, ज्ञानेश्वर भांडेकर, पांडुरंग समर्थ, विश्वनाथ बनसोड यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली. किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून ३७ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये उध्दव गहाणे, शेलेंद्र बिसेन, मनोज खांडेलवाल, मालु महावी, लेखा आत्राम, साधु गावडे, सपन जोगेन, संजित मिस्त्री, रबिन तारी, जगदिश्वर ठाकरे, रुपी नैताम, रामदास शेरकी, विलास कुकडे, रमेश नरोटे, अनिल कुकडे, भाऊराव नेताम, हितेश सातपुते, डोमदेव सातपुते, राजेंद्र कोटेवार, भास्कर चांभारे, वासु गावडे, रामा तुमरेटी, अतुल मिलकुलवार, सुधाकर मुत्यमवास, सूधाकर बुरांडे, रमेश नैताम, प्रदिप मंडल, श्रावण देशपांडे, गजानन मेश्राम, विलास दुधबळे यांची नियुक्ती करण्यात आली. व सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss