Latest Posts

राजे शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा वारसा पुढल्या अनेक पिढीपर्यंत प्रेरणादायी : लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोद पिपरे

– गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी शिव जयंती महोत्सव उल्हासात साजरा.
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अपराजित महान योद्धा, दूरदर्शी राजा, कुशल प्रशासक, कुशल संघटक, न्यायप्रिय शासक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. त्यामुळे शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यापर्यंत प्रेरणादायी असेल असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोद पिपरे यांनी केले.

गडचिरोली शहरामध्ये आज अनेक ठिकाणी शिव जयंती महोत्सव मोठ्या उल्हासात साजरा करण्यात आला.राजमुद्रा युवा प्रतिष्ठापणा टी पॉईंट चौक MIDC रोड गडचिरोली येथिल शिव जन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना ते बोलत होते.

लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी शिव जयंती निमित्याने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील टायगर ग्रुप च्या वतीने आयोजित भव्य-दिव्य अशा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व शिवराय युवा मंडळ विसापूर येथिल शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

याप्रसंगी राजमुद्रा युवा प्रतिष्ठापणा मंडळाचे शुभम आकुलवार, समीर रामटेके, सुमित चव्हाण, रोशन आकुलवार, प्रवीण लम्बुवार, विजय जाधव, शिवराय युवा मंडळ विसापूर येथील विशाल उरकुडे, सुरज ब्राह्मणवाडे, गौरव चांदेकर, सारंग जवादे, विजयकांत मडावी, शुभम कोटगले निकेश मारभते, कुमोद कोटगले, धीरज तिवाडे, विकास भोयर तर टायगर ग्रुपचे बारसागडे व सदस्य उपस्थित होते.

शिव जयंती महाउत्सावाचे औचित्याने विसापूर येथे वृद्धाश्रमातील आश्रित वयोवृद्ध यांना लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, शहर महामंत्री केशव निंबोळ यांच्या हस्ते शालीचे वाटप करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss