Latest Posts

सण २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या (अनटाईड ग्रँट) पहिल्या हप्त्याचे वितरण : खा. रामदास तडस यांची माहिती

– वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना 15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत वितरण
– वित्त मंत्रालय, भारत सरकार, पत्र 01 डिसेंबर 2023 नुसार निधी प्राप्त
– वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा जिल्हातील ग्रामपंचायतला 10 कोटी 79 लक्ष रूपये.
– अमरावती जिल्हयातील धामणगांव-चांदूर रेल्वे विधानसभा मोर्शी-वरूड विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतला 6 कोटी 96 लक्ष रूपये.
– महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभाग व्दारा 13 डिसेंबर 2023 ला शासन निर्णय निर्गमीत.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : 15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या (अनटाईड ग्रँट) पहिल्या हप्त्याचे वितरण वितरण केन्द्रशासनाने केले असुन वर्धा व अमरावती जिल्हयातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्ये अनुक्रमे 10:10:80 या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी दिली.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा जिल्हातील –
वर्धा पंचायत समिती अंतर्गत 76 ग्रामपचायंतीला रू. 2 कोटी 95 लाख 11 हजार,
सेलू पंचायत समिती अंतर्गत 62 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 20 लाख 81 हजार,
देवळी पंचायत समिती अंतर्गत 61 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 23 लाख 66 हजार,
आर्वी पंचायत समिती अंतर्गत 64 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 12 लाख 81 हजार,
आष्टी पंचायत समिती अंतर्गत 41 ग्रामपंचायतीला रू. 76 कोटी 26 हजार,
कारंजा पंचायत समिती अंतर्गत 59 ग्रामपंचायतीला रू. 90 लाख 85 हजार,
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत 76 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 42 लाख 32 हजार,
समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत 71 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 17 लाख 97 हजार,
असे वर्धा जिल्हयाला एकुण रू. 10 कोटी 79 लाख 79 हजार

अमरावती जिल्हयातील अमरावती जिल्हयातील धामणगांव-चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्रातील –
नांदगांव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत 68 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 36 लाख 27 हजार,
चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत 49 ग्रामपंचायतीला रू. 85 लाख 72 हजार,
धामणगांव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत 62 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 31 लाख 14 हजार,

मोर्शी-वरूड विधानसभा क्षेत्रातील –
मोर्शी पंचायत समिती अंतर्गत 67 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 58 लाख 91 हजार,
वरूड पंचायत समिती अंतर्गत 66 ग्रामपंचायतीला रू. 1 कोटी 84 लाख 29 हजार,
एकुण रू. 6 कोटी 96 लाख 33 हजार इतका प्राप्त झाला.

यामध्ये जिल्हयातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्ये अनुक्रमे 10:10:80 या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला असुन महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 13 डिसेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमीत करुन केन्द्रशासनाच्या निधी वितरण 01 डिसेंबर 2023 च्या आदेशावर कार्यवाही केली आहे. वितरीत करण्यात आलेला सर्व निधी थेट जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या थेट खात्यामध्ये हस्तातरीत करण्यात येणार असल्याचे शासन निर्णय नमुद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने या अगोदर सुध्दा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेला 15 व्या केन्द्रीय वित आयोग अंतर्गत निधी प्राप्त झालेला असुन आज केन्द्रसरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेला मोठया प्रमाणात निधी प्राप्त करून दिलेला आहे. 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थेला प्राप्त निधीमुळे ग्रामीण भागातील रस्ते तसेच अन्य विकासकामांना गती मिळणार गती मिळणार असुन 15 व्या वित आयोग अंतर्गत विकास कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले व वर्धा लोकसभाक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे आभार मानले.

Latest Posts

Don't Miss