विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली (Savli) : सावली तालुक्यातील मौजा- रूद्रापुर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार व खासदार अशोक नेते यांनी शंकरपट ला उपस्थित राहून शेतकरी बंधूशी चर्चा करत वार्तालाप केला.
याप्रसंगी खा. नेते यांनी शंकरपटाला शुभेच्छा देत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत शेतकरी बंधूनी विजयासाठी संकल्प महाविजय-२०२४ अब कि बार चारसौ पार फिर एक बार मोदी सरकार असा विजय संकल्प करत विजयी करा असा विनंती संदेश यावेळी दिला.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष विनोद धोटे, युवा नेते तथा ग्रा.प. सदस्य राकेश गोलेपल्लीवार जिबगांव, जेष्ठ नेते अशोक नागापूरे, टिकाराम मशाखेत्री, राकेश घोटेकर उपसरपंच कवठी, खुशाल राऊत, भास्कर राऊत, लोकनाथ भोयर, उमाजी नरुले, तुळशिराम राऊत तसेच मोठ्या संख्येने पट प्रेमी बंधू, शेतकरी बांधव उपस्थित होते.