Latest Posts

अनुदानावर प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण करण्याचे नियोजन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी हरभरा, जवस, करडई, मोहरी व ज्वारी या पिकांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांकडून बियाणांच्या मागणीसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत, तर पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाणाचा २ हेक्टर मर्यादेत लाभ दिला जाणार आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी बियाणे या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss