Latest Posts

बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : हॅलो कृषी ऑनलाईन: कित्येक दिवस कमी कांदा दरामुळे (Onion Market Rate) नाराज झालेल्याकांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सध्या अनेक बाजारपेठेत कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर कांद्याला ३० रुपये प्रति किलोपर्यंत भाव (Onion Market Rate) मिळाला आहे.

कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) वाढण्याचे वेगवेगळी कारणे असली तरी यावर सर्वात मोठा प्रभाव हा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा असल्याचे बोलले जात आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतपेटीतून सरकारविरोधी मतदान केले. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी कांद्याच्या दरात (Onion Market Rate) लक्षणीय वाढ झाली आहे.

दुसरे कारण म्हणजे बाजारात कांद्याची (Onion Market) आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याची निर्यात वाढल्याने आणि स्थानिक बाजारपेठेतील पुरवठा कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत.

वेगवेगळ्या बाजारपेठेतील कांद्याचे दर –
सोलापूर : ३३ रुपये प्रति किलो
पुणे : १ हजार ६०० ते २ हजार रुपये प्रति क्विंटल
इस्लामपूर : १ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल
चंद्रपूर : १ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल
सातारा : २ हजार ते २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल

कांद्याच्या दरात वाढ होण्याचे विविध कारणे असली तरी यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) सुखावला असेल हे नक्की. उशिरा का होईना शेतकर्‍यांच्या कांद्यास चांगले दर मिळत आहेत.

Latest Posts

Don't Miss