Latest Posts

NEET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अंतिम तारीख ०९ मार्च

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारत देशात कोणत्याही राज्यात किंवा इतर देशात वैद्यकीय शिक्षण घेणे करीता अत्यंत आवश्यक परीक्षा नीट २०२४ चे ०९ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज भरणे सुरु झाले असून ०९ मार्च २०२४ फॉर्म भरणे करीता शेवट ची तारीख आहे.

ज्या विद्यार्थ्यांना १२ वी सायन्स नंतर MBBS, BAMS, BVSC, BDS, BHMS, BPTH, BUMS, OPTH या पैकी कोणत्याही अभ्यासक्रम ला महाराष्ट्र, इतर राज्यात, देशात प्रवेश घ्यायचा असल्यास NEET परीक्षा देणे बंधनकारक आहे, सदर परीक्षा ०५ में २०२४ ला होणार असून सदर परीक्षेत भोतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र विषय असतात.

सदर परीक्षा ७२० गुणांची राहते, नवीन प्रश्नपत्रिका नुसार २०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. त्या पैकी १८० प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला ०४ गुण असतात व निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे ज्ये प्रश्न येतात. तेच विद्यार्थ्यांनी सोडवायला पाहिजे, विदर्भातील ज्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षा संदर्भात, फॉर्म भरणे संदर्भात, NEET परीक्षेच्या पूर्व तयारी करीता किंवा NEET परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया संदर्भात काहीही शंका, प्रश्न असतील त्यांनी कल्पतरू अकॅडमी मदत घेऊ शकतात. अधिक माहिती करीता विद्यार्थ्यांनी कल्पतरू अकॅडेमी, युनियन बँक जवळ गडचिरोली व KDK कॉलेज जवळ, नंदनवन नागपूर मो. ८८३०९८९०४६ येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss