Latest Posts

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड तर्फे सुरजागड येथील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : लाईडस मेटल अँड एनर्जी लिमिटेडने आपल्या सुरजागड खाणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वर्तन आधारित सुरक्षा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. हे प्रशिक्षण जगप्रसिद्ध आणि भारतातील B.B.S चे जनक हरबंस लाल यांनी दिले होते.

३० आणि ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित या प्रशिक्षण शिबिरात अंदाजे २२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी B.B.S साठी एक मुख्य संरक्षक कवच आहे. I.S.O. ४५००१ द्वारे प्रमाणित या शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

सुरजागड येथे खान सुरक्षा विभागाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक आर. सत्पती, महाव्यवस्थापक जीवन हेदू, सुरक्षा अधिकारी मोहसीन खान, महाव्यवस्थापक गणेश सेठ आदी अधिकारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss