Latest Posts

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अहेरीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : महाराष्ट्र राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अहेरी येथे भव्य मरोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गांधी चौकात आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम व मान्यवरांनी यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, विशेष अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडन्ट एम एच खोब्रागडे, ९ बटालियनचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

अहेरी मॅरेथॉन २०२४ अर्थात दौड स्पर्धेचे शुभारंभ अहेरीच्या मुख्य चौकात सकाळी ६ वाजता झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलित आणि शांतीचे प्रतीक कबुतरांच्या थव्यांना आकाशात उडवून शाही थाटात व शानदार उदघाटन करण्यात आले तसेच आकाशात फुगे सोडण्यात आले. एकंदरीत भव्य दिव्य असा उदघाटन सोहळा अहेरी मॅरेथॉनचा संपन्न झाला.

या मॅरेथॉन स्पर्धेत युवक, युवती, सीआरपीएफ ३७ बटालियनचे व ९ बटालियनचे जवान सहभाग घेतले. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा दौड स्पर्धेत सहभाग घेतले. या स्पर्धेतील विजेत्यांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शिल्ड देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss