Latest Posts

गडचिरोली : जिल्हा कृषि महोत्सव २०२३ – २४ चे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : २३ ते २७ जानेवारी, २०२४ या कालावधीत गडचिरोली येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभूत ठरेल य शेतकन्यांच्या उत्पनात वाढ होईल, हे उद्दिष्ठ ठेवत या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व सर्व संलग्न विभाग मार्फत बचत गटांचे प्रदर्शन व उत्पादन विक्री देखील ठेवण्यात येणार आहे. जिल्हयात कृषि क्षेत्रात काम केलेल्या प्रगतशिल व उदयन्मुख शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने प्रकल्प संचालक (आत्मा), गडचिरोली यांनी अशा शेतक-यांनी कामाचा तपशिलासह प्रस्ताव सर्वाधत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत मागविण्यात आले आहे.

सर्व इच्छुक शेतकरी बांधवाना विनंती आहे  की, त्यांनी आपल्या तालुक्याचा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन प्रस्ताव सादर करावेत. तसेच इच्छुक कृषि व कृषि संलग्न उत्पादनाची कृषि पुरक उत्पादकांनी विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल ची नोंदणी प्रकल्प संचालक (आत्मा), गडचिरोली यांचे कार्यालयात १० जानेवारी २०२४ पर्यंत करावा.

स्टॉल ची संख्या मर्यादीत असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्यावर नोंदणी करण्यात येईल. नोंदणीकरिता स्टॉलसाठीचे शुल्क आत्मा कार्यालय गडचिरोली मार्फत कळविण्यात येईल. यासाठी डॉ. ए. एम. कापगते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (संपर्क क्र. ८९९९१८०४७४) यांच्याशी संपर्क साधावा,

तरी जिल्हातील जास्तीत – जास्त महीला बचत, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विक्रेता यांनी जिल्हा कृपि महोत्सव २०२३ – २४ या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss