विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शेतकऱ्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत ऍग्रीस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) हि योजना आलेली आहे. या योजनेमध्ये शेतक-यांचा आधार कार्ड त्यांच्या मालकीच्या ७/१२ सोबत जोडून त्यांना एक ओळख क्रमांक देण्यात येईल. माहिती संच निर्मीतीची प्रक्रिया हि महसुल विभाग, कृषी विभाग आणि ग्राम विकास विभागाकडील (ग्राम स्तरीय कर्मचारी), ग्राम महसुल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी यांचे कडुन शेतकरी यांनी ओळख क्रमांक प्राप्त करुन दिले जाईल.
ओळख क्रमांक तयार झाल्यानंतर शेतक-यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेणे सोईचे व फायदेशीर ठरेल. शेतकरी ओळख क्रमांक निर्मितीसाठी शेतकरी यास ग्राम महसुल अधिकारी व त्यानंतर कृषी सहाय्यक यांचेकडील कामकाजासाठी नागरी सुविधा केंद्र व तसेच Self (http://mhfr.agristack.gov.in/) द्वारे अर्ज करता येईल. ज्यांचा फायदा केंद्र व राज्य शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करणे करिता शक्य होणार आहे.
फायदे –
पि.एम. किसान, पिक विमा, पिक कर्ज, खरेदी केंद्र इत्यादी योजनांचा शेतकऱ्यांना जलद लाभ घेता येईल. शासनाला कृषीसंबंधी योजनांची आखणी व अमलबजावणी करण्याकरीता शेतकऱ्यांची माहिती उपयुक्त ठरेल, अशी ही योजना शेतकऱ्यांना व शासनाला फायदेशीर ठरणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी ग्रामस्तरीय समिती तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसवेक यांना आधार जोडणे व शेतकरी ओळख आयडी तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांना कळविले आहे.