Latest Posts

पेपर मिल बांबू डेपोत बिबट्याचा वावर : कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur)  : स्थानिक पेपर मिलमध्ये कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या बांबू आणि निलगिरी, सुबाबुळ लाकडाचा साठा करण्यासाठी पेपर मिल ने न्यू कॉलनी क्वार्टरजवळ बांबू डेपो तयार केले. काही दिवसांपासून बांबू डेपो चा आवारातील लाकडाचा साठ्यात बिबट्याने अधिवास केला आहे.

नुकतेच या बिबट्याने बांबू डेपोत काम करणाऱ्या महिला मजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्क महिलेने मागून हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला हाकलून लावले. भरदुपारी बिबट्याचा वावर असल्याने बांबू डेपोत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Latest Posts

Don't Miss