Latest Posts

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने आम आदमी पार्टी, वन विभाग व पेपरमिल प्रशासन यांच्यात बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : १८ मार्च रोजी शहरातील दिनदयाल वार्डातील न्यु काॅलनी परिसरातील पेपर मिलच्या बांबू डेपो मुळे शहरात वन्य प्राण्यांची दहशत, पेपरमिल मुळे होणारे वायु व जलप्रदूषण, पेपरमिल च्या ट्रकामुळे ट्राफिक समस्या, सीएसआर फंड चा जनहितासाठी उपयोग अश्या अनेक जनहिताच्या मुद्द्यांना घेऊन आम आदमी पक्षाने पेपरमिल प्रशासनासोबत बैठकीची मागणी केली होती.

यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार यांनी ही बैठक घेतली. या बैठकीत पेपरमील चे दोन अधिकारी व वनविभाच्या अधिकारी यांच्यासह आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, संघठन मंत्री भिवराज सोनी, कोषाध्यक्ष सरफराज भाई, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार व अफजल अली, सचिव ज्योतिताई बाबरे, संगठन मंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, मनीषा अकोले, गणेश अकोले सह आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss