Latest Posts

परायनार ग्रामपंचायतीवर आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एक हाती सत्ता

– माजी जि.प. अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात लढविली निवडणूक.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये परायनार ग्रामपंचायतीचे ५ सदस्य निवडून आले. उपसरपंच पदाच्या निवडनुकित- जिवन चैतू मडकामी हे उपसरपंच पदी विराजमान झाले. व थेट सरपंच म्हणून नंदू चुकू महाका हे विराजमान झाले.

उपसरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत समोर संपूर्ण कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.

यावेळी भामरागडचे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी, आविसं अजयभाऊ मित्रपरिवारचे भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तीम्मा, युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामी, भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विष्णु मडावी, बाजार समिती संचालक सैनू आत्राम, लालसू आत्राम, नरेंद्र गर्गम, प्रभाकर मडावी, चिनू सडमेक, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनी महेश वडे, समी कोलू पुंगाटी, सुनिता देवू पुंगाटी, अक्षय चुक्कु मीच्चा, साधू चेतू पुंगाटी, श्यामराव येलकलवार सह स्थानिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss