Latest Posts

आईवडील खरे देव असून त्यांच्या सेवेतुनच पुण्य लाभते : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

– बरडकीन्ही येथे खंजिरी भजन स्पर्धा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : माणूस सुखी राहण्यासाठी देवाचे दर्शन घेत प्रार्थना करत असतो. परंतु आपले जन्मदाते आईवडील हे खरे देव असून त्यांची सेवा करा. कारण त्यांच्या सेवेतुनच माणसाला खरे पुण्य लाभते, असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपूरी तालुक्यातील बरडकीन्ही येथे खंजिरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगला लोनबले, बरडकीन्ही सरपंच मनोज बन्सोड, गांगलवाडी सरपंच विवेक बनकर, उपसरपंच भास्कर गोटेफोडे, ग्रा.पं. सदस्य वसंता बगमारे, ग्रा.पं. सदस्य होमदेव ठाकरे, ग्रा.पं. सदस्या माधुरी ढोंगे, सुनीता मेश्राम, सुचिता दाणी, संगीता पाकडे, विरेंद्र जयस्वाल यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना विरोधीपक्षनेता विजय वडेट्टीवार म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे माणसातील देव शोधत सेवेला धर्म समजणारे संत होते. भारताला पुढे नेण्यासाठी सर्व जाती धर्म पंथातील लोकांना एकत्र आणले पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी समाज निर्भीड बनवण्यासाठी, समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशाच्या शत्रुंविरूध्द लढा उभारण्यासाठी सैनिकांना आपल्या भजनांतून प्रेरणा देणारे, समाजाला योग्य मार्गदर्शन करीत समाज उभा करणारे ते संत होते.

आमदार म्हणून समाजातील दुःखी माणसाचे दुःख वेचण्याच काम करतोय. कारण माणूस हा माणसाचा आधार झाला पाहिजे ही भावना आहे. संतांच्या विचारांचा पायीक आहे. त्यामुळे दारात रडत आलेला माणूस हा जातांना हसतच गेला पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय, असेही यावेळी विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन समीर मैंद यांनी केले.

Latest Posts

Don't Miss