Latest Posts

प्रवासी रेल्वे गाड्यांचे जुने झालेले डबे बदलून एलएचबी श्रेणीचे नविन डबे बसविण्यात यावे : खासदार रामदास तडस

– खासदार रामदास तडस यांनी अतांराकिंत प्रश्न संख्या ३२३७ अंतर्गत लोकसभेत उपस्थित केला प्रश्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : रेल्वे प्रवास करीत असतांना आपण बघतो कि, काही रेल्वे गांडयामध्ये अजुनही पंरपरागत जुने डबे वापरण्यात येत आहे, तर काही रेल्वे गाडयामध्ये आधुनिक पध्दतीने निर्मीत केलेले एलएचबी (LHB) कोच वापरण्यात येतात. आपल्या विभागातील रेल्वे प्रवासांच्या सुविधेकरिता रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाडयामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत केलेले एलएचबी कोच यांच्या मागणीच्या अनुषंगाने लोकसभेत खासदार रामदास तडस यांनी प्रश्न संख्या ३२७३ अंतर्गत मुद्दा उपस्थित केला.

यावेळी केन्द्रीय मंत्री यांनी लेखी उत्तर दिले की, सद्यस्थितीत ३१७६८ एलएचबी कोच चलनात असुन मध्य रेल्वेच्या अंतर्गत २२५९ एलएचबी कोच मध्य रेल्वे झोन कडे देण्यात आले आहे व एलएचबी (LHB) कोच पुरविणे ही एक सतत प्रक्रिया असुन लवकरच आपली मागणी प्राधान्याने विचारात घेतली जाईल असे स्पष्ट केले.

आपल्या विभागातुन प्रवास करणा-या ज्या गाडयामध्ये जुने डबे वापरल्या जातात त्यात प्रामुख्याने सेवाग्राम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, नागपूर पुणे एक्सप्रेस, प्रेरणा एक्सप्रेस इत्यादी अनेक गाडयांचा समावेश आहे. सर्वच्या सर्व गाडयामध्ये प्रवासाच्या सुविधेकरिता एलएचबी (LHB) कोच बसविण्यात यावे, याकरिता हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर निश्चीतच रेल्वमंत्रालय सकारात्मक विचार करेल असे खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

Latest Posts

Don't Miss